महागाई म्हणजे काय? मी फार पूर्वीपासून वडीलधारयांकडून महागाई वाढली, आजकाल किती महागाई वाढलीय असे ऐकत आलोय. आमच्या काळात ईतकी महागाई नव्हती. किती स्वस्ताई होती. पैशाला पायलीभर ज्वारी मिळत होती. एक आण्यात थैलीभर सामान यायचे. पांच-दहा रुपयात महिन्याचे किराणा सामान व्हायचे. सोने ५०-६० रुपये तोळा होते. आता काय जमाना आलाय! पोतंभर पैसे नेले; तर पिशवीभर सामान येते. कलयुग दुसरे काय?
आतातर महागाई आकाशाला भिड्लीय. शंभर रुपयात पिशवीभर भाजी सुद्धा येत नाही. सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत. लांब कशाला, १९६०-१९६२मध्ये १००-१२५ रुपयात एका कुटुंबाचे घर चालायचे. त्याकाळी कारकुनाला १०० रु. पगार होता; पण तेवढ्यात घर चालायचे. पुरुष मजुरांना ५ रु. आणि स्त्री मजुराला ३ रु. रोजची मजुरी मिळायची. तेवढ्यात त्यांचा संसार व्यवस्थित चालत असे. मग ही महागाई आली कोठून? कशी वाढली?
पूर्वीच्या ५०-६० रु. तोळा सोन्याच्या काळात विकास नावाची गोष्टच नव्हती. खेड्या-पाड्यापर्यंत पक्के रस्ते, वीज, शाळा, टीव्ही सोडा; पण फोन, रेडीओ सुद्धा नव्हते. पिठाची गिरणी, पाण्याचे नळ नव्हते. सिनेमे, हॉटेली नव्हत्या. लोकांच्या गरजा अगदी कमी होत्या. मुख्य गरजा म्हणजे खाणे, कपडा, पायताण अशाच होत्या.त्या जवळच्या बाजारपेठ असलेल्या गावातून भागविल्या जायच्या. दाळ दाना , धान्य इ. शेतात पिकविले जायचे. शेतकरी शेतात पिकलेल्या धान्यातूनच काही धान्य बियाणे म्हणून पुढच्या वर्षासाठी ठेवायचा. जनावरांचे शेण, उकीरड्यावरील कचरा हेच खत म्हणून शेतात टाकायचा. रासायनिक खत नाही, की कीडनाशके नाही. म्हणजेच शेंद्रीय पद्धतीने शेतीत पिके घेतली जायची. त्यामुळे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असायचे. जनावरांमुळे दूधदुभते भरपूर असायचे. खाऊन पिऊन माणसे सुखी असायची.
काळ बदलला. विकास होत गेला. सुधारणा झाल्या. पक्के रस्ते झाले, वीज आली, शाळा झाल्या, धरणे झाली, कालवे झाले, नळ आले, विहिरीवर मोटारी आल्या , रासायनिक खते आली, सुधारित बियाणे आले, कीडनाशक औषधे आली, रेडीओ, टीव्ही, फोन, मोबाईल, सिनेमे, हॉटेली, बार्स उघडले, गावाला, तालुका, जिल्हा कोठेही जाण्यासाठी वाहने, बस, खाजगी वाहतूक जीप, कार सर्व आले. चंगळवादी साधनांची भरमार झाली. बाजारपेठा वाढल्या, उद्योगधंदे वाढले. राहणीमान वाढले. फॅशन्स वाढल्या. प्रसाधने वाढली. खर्च वाढले. शिक्षणाचे प्रमाण वाढले. डॉक्टर, इंजिनीअर सर्व क्षेत्रात आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध झाले. शहरे वाढली. जग जवळ आले. आंतरराष्ट्रीय संबंध वाढले. आयात निर्यात वाढली. आंतरराष्ट्रीय किमतीनुसार दर वाढू लागले. गरजा वाढल्यामुळे मागणी वाढली. मागणी वाढत गेली; तशा किमती वाढू लागल्या. किमती वाढू लागल्या तसे उत्पन्न वाढू लागले. पगारदारांचे पगार १०० रु. हून १० हजार रु. झाले, मजुरी ५ रु. वरून २५०-३०० रु. झाली. रिक्षा भाडे ५-१० रु. वरून ५०-६० रु. झाले. भाजी ४-५ रु. वरून १५-२० रु. झाली. थोडक्यात जशा गरजा वाढल्या, मागणी वाढली; तशा किमती वाढल्या; त्यामुळे महागाई वाढली; आणि म्हणून उत्पन्न वाढले.
याचा दुसरा अर्थ महागाई वाढत नाही; तर जशी मागणी वाढते तशा किमती वाढतात; आणि किमती वाढतात तसे उत्पन्न वाढते. हे एक प्रकारचे चक्रच आहे.
दुसऱ्या देशात युद्ध सुरु झाले, की तेलाच्या किमती वाढतात. त्या प्रमाणात आपल्याकडेही त्या वाढवाव्या लागतात. कांदा निर्यात झाला, की देशात त्याचा भाव वाढतो. निर्यात बंदी केली, की भाव पडतो, कांदा सडतो, फेकून द्यावा लागतो. मग आंदोलने, संप सुरु होतात. जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात असेच चालते. मग "अच्छे दिन आयेंगे " म्हटलं तरी दर वाढवावे लागतात. हा कडू औषधाचा डोस समजायचा; दुसरे काय? जनता विष पचवते: तेथे कडू औषध पचविणारच. पण कडू औषध देणाराने " अच्छे दिन " लवकरात लवकर कसे आणता येतील ते पाहावे. त्यासाठी भ्रष्टाचार संपविणे महत्वाचे आहे. कायदे कडक करून त्याची अंमलबजावणी सुद्धा तितकीच कडक झाली पाहिजे. जनता आशेवर जगत आहे. या आशा पूर्ण करील अशी व्यक्ती समोर आल्यामुळे जनतेने त्या व्यक्तीची " दिल मांगे मोर" ही इच्छा पूर्ण केली. आता जनतेचे स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. जनता " अच्छे दिन " कडे डोळे लाऊन बसली आहे...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा